Write in Marathi or Hindi and copy-paste

Monday, May 10, 2010

३ ’मे’चे"मॊटरमनचे आंदोलन" मिडिया आणि सर्वसामांन्यांच्या नजरेतून...

३ ’मे’चे" मॊटरमनचे आंदोलन" मिडिया आणि सर्वसामांन्यांच्या नजरेतून...

मोटरमनच्या आंदोलनामुळे सर्वसामांन्यांना झालेल्या त्रासामुळे मिडियाने मोटरमनना अक्षरश: झोडपून काढले. कुणी लाखभर पगाराचे खोटे आकडे प्रसिद्ध केले, तर कुणी मोटरमनमानी बंद करा या शीर्षकाखालील लेख लिहून मोटरमनविरुद्ध वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. मोटरमनची बाजू जाणून घेण्याची गरज कुणालाही वाटली नाही. पण, अशा परीक्षेच्या घडीला सर्वसामांन्य प्रवाशांनी मात्र मोटरमनना पठिंबाच दिला. त्याबद्दल त्यांचे हार्दीक आभार. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडण्यासाठी हा ब्लॉग सुरू केलेला आहे. या माध्यमातून मोटरमनना आंदोलनासाठी बाध्य करणार्‍या रेल्वे प्रशासनाचा पर्दाफ़ाश करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

दिनांक १०.०५.२०१० च्या "लोकसत्ता" मधील लोकमानस सदरात प्रसिद्ध झालेले एका वाचकाचे पत्र येथे देत आहोत.


(पत्राचे शीर्षक आहे) मोटरमनचा मार्ग चुकला, पण...

मोटरमन आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन संपावर गेले, त्यांच्या या संपाचे समर्थन होऊच शकत नाही, तरीही मोटरमनच्या गार्‍हाण्यांकडे लक्ष द्यायला हवे. मोटरमन हासुद्धा माणूसच आहे, ’यंत्र ’ नव्हे! वर्षाचे ३६५ दिवस तो अविरत काम करत असतो. उपनगरी प्रवाश्यांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत पोहोचवायचे काम तो चोख बजावत असतो. रुळांवर आलेले पाणी, ओव्हरहेड वायर तुटणे, बॉम्बस्फोट आदी प्रसंगांनाही त्याला वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. गादीला उशीर झाला किंवा वाटेत गाडी खॊळंबली की त्या चालकाला मारहाण करुन त्याचा उद्धार करणारेही आपण पाहात असतो. त्याच्यावर असणारा तण कुणी लक्षात घेत नाही, ही त्याची व्यथा असू शकते. या आंदोलनाची पद्धत पूर्णत: चुकीची आहे, पण म्हणून त्यांच्या मागण्या दुर्लक्षित राहू नयेत.

निमिष गोखले, पुणे

याचप्रमाणे,
"मुंबईचा वाली कोण?" या शीर्षकाखाली मोटरमनच्या आंदोलनाबद्दल (वस्तुस्थिती जाणून घेऊन) रेल्वे प्रशासन व रेल्वे बोर्डाच्या फ़ास्ट ट्रॅक कमिटीला दोष देणारे पत्र लिहीले आहे, श्री. महेंद्र सुरवाडे, मुंबई, यांनी.

दोन्ही लेखकांचे हार्दीक आभार.


1 comments:

Post a Comment

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More